Saturday, April 27, 2024
Homeराजकीयभाजपाचे भगवान गवळी यांची उपमहापौरपदी निवड

भाजपाचे भगवान गवळी यांची उपमहापौरपदी निवड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रं.5 चे नेतृत्व करणारे भगवान शंकर गवळी हे 50 मते मिळवून उपमहापौरपदी विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे खान सदिन हुसेन रहेमतुल्लाह यांना 19 तर एमआयएमच्या शेख मेहरुन्नीसा जाकीर यांना केवळ चार मते मिळाली.

- Advertisement -

उपमहापौर पदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्यामुळे आज उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा ऑनलाईन घेण्यात आली.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने खर्‍या अर्थाने न्याय दिला. त्यामुळेच मी आज उपमहापौर होवू शकलो. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने यापुढील वाटचाल करेल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर राहील. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल.

भगवान गवळी, उपमहापौर

सभेच्या प्रारंभी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. यात चारही अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिट वेळ देण्यात आला होता. यावेळी कोणीही माघार घेतली नाही.

त्यामुळे निवडणूक रिंगणात भाजपातर्फे भगवान गवळी, काँग्रेसतर्फे खान सदिन, एमआयएमतर्फे शेख मेहरुन्निसा जाकीर हे तीन जण असल्यामुळे हात उंच करुन मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

भगवान गवळी यांना 50, खान सदिन यांना 19 तर शेख मेहरुन्नीसा यांना चार मते मिळाली. सर्वाधिक गवळी यांना 50 मते मिळाल्याने त्यांची उपमहापौर पदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यादव यांनी जाहीर केले.

महापौर निवडणूक नंतर

महापौर पदाच्या आरक्षणाच्या विषयावरुन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांच्या निवडीचा कार्यक्रम न घेता केवळ उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. महापौरांची नव्याने निवड होईपर्यंत चंद्रकांत सोनार हेच महापौर म्हणून काम पाहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या