आम्ही पेंग्विनसेना म्हणू का? आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

आम्ही पेंग्विनसेना म्हणू का? आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

मुंबई | Mumbai

शिवसनेते (ShivSena) मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये (bjp) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका सुरू आहेत. आजही सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. या टीकेला आज भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत “कृपया,हे लक्षात असू द्या!”, असं म्हटलं आहे. तसेच, ''आपण आमच्या कमळाला हिणवायला "बाई" म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता "पेग्विन सेना " म्हणायचे का? ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण असल्याचं देखील शेलारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दीक वाद वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात काय म्हटलंय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे कॉँग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. झारखंड, दिल्लीमध्ये 'ऑपरेशन लोटस'चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची 'हात'घाई भाजपकडून सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com