आशिष शेलारांकडे BCCI ची मोठी जबाबदारी

भाजपा नेते आशिष शेलार
भाजपा नेते आशिष शेलार

मुंबई | Mumbai

BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीसाठी खांदेपालट पाहायला मिळाली. माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा अध्यक्षपदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ आज संपला. रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

तर भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे BCCI ने मोठी जबाबदारी दिली आहे. खजिनदार म्हणून शेलार यांची निवड करण्यात आली आहे. ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आता शेलार यांच्याकडे असणार आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात BCCI च्या तिरोजीत जवळपास ६०० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत दिले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेलार यांना BCCI च्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आशिष शेलार हे जून २०१५ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले.

त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com