
अहमदाबाद | Ahmadabad
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसून येत आहे. आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजणार याची जोरदार चर्चा सुरु होती. अनेक नेत्यांची नावे समोर येत होती...
मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी घोषणा केली आहे.
येत्या १२ डिसेंबरला दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.