मुंबई / प्रतिनिधी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी भालके यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. दिली.

भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर रोजी २०२० अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १७ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान,भाजपने येथून समाधान औताडे यांना उमेदवारी घोषित केली आहे