
दिल्ली | Delhi
दिल्लीत एमसीडी निवडणुकीनंतर आज महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांचीही निवड होणार आहे. मतदानापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. मात्र त्यापूर्वीच सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.
सभागृहात भाजप आणि आप नगरसेवक एकमेकांशी भिडले. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी केली गेली. नामनिर्देशित नगरसेवकांच्या शपथविधीबाबत दिल्ली महापौर निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी नागरी केंद्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.