Monday, April 29, 2024
Homeराजकीयपंजाबमध्ये राजकीय भूकंप? अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर?

पंजाबमध्ये राजकीय भूकंप? अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर?

दिल्ली | Delhi

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका (punjab assembly election) असल्याने राजकीय वातावरण (panjab politics) चांगलंच तापलं आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी (Captain Amrinder Singh) दिलेल्या राजीनाम्यानंतर पंजाबचे राजकारण (panjab political news) चांगलेच ढवळून निघाले आहे. नवज्योतसिंग सिद्धू (Navjot singh sidhu) यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काँग्रेस (Congress) हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता.

- Advertisement -

पंजाब काँग्रेसमधील (Panjab COngress) कलह दूर करण्यासाठी हायकमांडने केवळ पक्षाचाच नव्हे तर राज्यातील सरकारचा चेहरामोहरा बदलला. मात्र, काँग्रेसची (Congress) चिंता कायमच आहे. कारण, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) हे सातत्याने संकेत देत आहेत की येत्या काळात ते काही मोठी पावलं उचलू शकतात. यामुळे पक्षाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) हे दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह (Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. दरम्यान काँग्रेसचा (Congress) चेहरा जर नवज्योतसिंह सिद्धू (Navjot singh sidhu) असतील तर त्यांच्या पराभव करण्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या आधीच स्पष्ट केलंय. तसेच पंजाब काँग्रेसच्या (Panjab Congress) अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या (BJP) दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती.

याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने (BJP) आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्लीत येणार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president JP Nadda) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? याची उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या