चाळीसगाव : आमदारांच्या कार्यालयातून खासदारांच्या कामांची उजळणी

शहवि आघाडीने न.पा.च्या दीड कोटींच्या निविदाप्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा भाजपाचा पत्रपरिषदेत आरोप
चाळीसगाव : आमदारांच्या कार्यालयातून खासदारांच्या कामांची उजळणी

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव नगरपरिषदेत भाजपाची सत्ता आल्यापासून तत्कालीन आमदार तथा विद्यामान खासदार यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षात ३०० कोंटीच्या कामांना मजुंरी मिळाली असून ते मार्गी लागले आहेत, त्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली असल्याची स्पष्टोक्ती आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपाच्या नगराध्यक्षांसह, गटनेते व नगरसेवकांनी केली.

यामुळे गेल्या चार वर्षात तत्कालीन आमदार तथा खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या कामांची उजळी एकप्रकारे पत्रपरिषदेत करण्यात आली. तर शहवि आघाडीवर देखील गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहे.

शहरातील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योद्य कार्यालयात आज( दि,२१) भाजपातर्फेे पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता विश्‍वास चव्हाण, न.पा.चे गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपाचे शहराध्यक्षा तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अरुण आहिरे, चिरोगोद्दीन शेख, चंद्रकांत तायडे, नगरसेविका विजया पवार आदि उपस्थित होते.

पुढे माहिती देतांना भाजपाचे नगरसेवक म्हणाले की, तात्कालीन आमदार तथा खासदार उन्मेष पाटील व नतंर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील २६५ कोटींच्या कामांना मुंजरी मिळाली आहे. यात शिव स्मारक, शिवसृष्टी, पाणीपुरवाठ योजन, भुयारी गटार योजना, जिमखाना, धनकचरा व्यवस्थापन, ओपन स्पेस डेव्हलपमेटं आदि कामांचा समावेश आहे. हे सर्व कामे होत असताना, शहवि आघाडीतर्फे वेळोवेळी खोडा घालण्याचे काम करण्यात आले आहे.

विरोधकांचा विरोध फक्त आपले खिसे ठेकेदारांकडून कसे गरम होतील यासाठी असतो. शहरातील पाईपालईनचे काम करणार्‍या ठेकेदाराला दमदाटीकरुन शहवि आघाडीचे नगरसेवक आपल्या प्रभागात काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच गेल्या ४० वर्षात मुस्लीम समाजासाठी शहरवि आघडीतर्फे एकही ठोस काम करण्यात आले नाही. गेल्या दोन वर्षांपासून न.पा.ला पूर्णवेळ मुख्याधिकारी न मिळु देण्यामागे शहवि आघाडीचा हात असून शहरातील विकास काम होवू नयेत म्हणून, मंत्रालयात बसून आधिकार्‍यांवर दबाव आनला जात असल्याचा देखील आरोप भाजपाच्या नगरसेवकांंनी केला आहे. गेल्या चार वर्षात शहर विकासाचे व्हिजन डोळ्यापुढे ठेवून आम्ही काम करीत आहोत. सद्यास्थिती शहरातील भुयारी गटार व पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचे कामेे चालू असल्यामुळे नवीन रस्ते तयार करता येत नाही, तरी देखील त्वरीत रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

दिड कोंटीच्या निविदाप्रक्रियेत गैरप्रकार

गेल्या चार वर्षात शहरवि आघाडीतर्फे शहरातील विकास कामांमध्ये अडथळा निर्माण केला जात असून शहरातील विकास कामासंदर्भात दिड कोटींच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करण्यात आलाचा आरोप यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांनी केला. यात प्रभाग क्र.३ मध्ये नागरी दलितेतर योजनेंतर्गत मोकळ्या भूखंडावर सरंक्षण भिंतीचे व कॉक्रीटीकरण काम, डोंगरी नदीवर फरशीचे बांधकाम, प्रभाग क्र.१० मध्ये रेहमान नगर मधील खुल्या जागेवर कुंपन भिंत, प्र.क्र.१६ मध्ये कॉक्रीटीकरण व गटरा बांधकाम, प्र.क्र.५ मध्ये भिलाटी लगत नाला बांधकाम करणे आदि कामांचा समावेश आहे. या कामांच्या निविदा प्रकियेत शहरवि आघाडीच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन व प्रशासनातील लोकांनी इतर मक्तेदाराना कागदपत्रांनी पूर्तता करता येऊ नये म्हणून पूर्वनियोजीत निविदाप्रक्रिया राबवण्यात आल्या आहेत. तर निविदा प्रक्रियेत एकच मक्तेदार सर्व निविदांमध्ये सहभाग घेऊन ठराविकच निवेदेत कागदपत्रांची पूर्तता, शहवि आघाडीच्या नेत्यासोबत मिळून निविदाप्रकिया मॅनेज केली असल्याचे सिद्ध होत असल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com