OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; महाराष्ट्र भर चक्काजाम आंदोलन

दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात
OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; महाराष्ट्र भर चक्काजाम आंदोलन

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात मराठा आरक्षणा (Maratha Reservation) पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा देखील पेटायला सुरूवात झाली आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात चक्काजाम (Chakkajam Aandolan) आणि जेलभरो आंदोलन (Jail Bharo Aandolan) सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून राज्यातील विविध शहरात भाजप (BJP) नेते व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच, मुंबईतही भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

त्याचबरोबर, आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

औरंगाबाद येथेही भाजपच्या चक्का जाम आंदोलनावेळी पोलिसांनी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या सह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com