आमदारांच्या निलंबनानंतर भाजपा आक्रमक

दोंडाईचात भास्कर जाधवांचे पोस्टर जाळले, बाभळे फाट्यावर जोडे मारो आंदोलन
आमदारांच्या निलंबनानंतर भाजपा आक्रमक

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

आमदार जयकुमार रावल यांच्यासह 12 आमदारांचे निलंबन करून सरकारने भाजपचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यांच्या निषेधार्थ जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सेना आ. भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याची प्रतिमा जाळून निषेध नोंदवला.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, सरचिटणीस कृष्णा नगराळे, बांधकाम सभापती निखिल राजपुत, नगरसेवक भरतरी ठाकुर, भाजपाचे सरचिटणीस पंकज चौधरी, अनिल सिसोदिया, श्रीकांत श्रॉफ, नरेंद्र बाविस्कर, महेंद्र गिरासे, भैय्या धनगर, कालु धनगर, जितेंद्र गिरासे, खालील बागवान, जलील बागवान,महेंद्र गिरासे, चंद्रसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

तसेच शिंदखेडा तालुका भाजपातर्फे बाभळे फाट्यावर शिवसेनेचे आ. भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष रमेश खैरनार, जि.प सदस्य पंकज कदम, पं.स सदस्य प्रवीण माळी, शिंदखेडा शहराध्यक्ष दत्तात्रय पाटील, वायपूर उपसरपंच मनोहर रुपनर, दत्तू पाटील, अजय पाटील, सागर पाटील, राकेश पाटील, ललित पाटील, कुलदीप खैरनार, शांताराम कोळी, अरुण पाटील, काशिनाथ शिंदे , समाधान पाटील, नाटू ठेलारी, मोहन ठेलारी आदी उपस्थित होते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com