Saturday, April 27, 2024
Homeराजकीयबिहार : सरकार पुढील पाच वर्ष टिकणार - देवेंद्र फडणवीस

बिहार : सरकार पुढील पाच वर्ष टिकणार – देवेंद्र फडणवीस

दिल्ली । Delhi

आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर ते सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीत NDAला 125 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना त्यांना मिळालेल्या जागांप्रमाणे मंत्रिपदं देण्यात आली आहेत.शपथविधी सोहळ्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, NDA चे सरकार पुढील पाच वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, NDA चा बिहार विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय झाला आहे. हे सरकार पुढील 5 वर्ष टिकून राहील आणि राज्याला नक्कीच पुढे घेऊन जाईल. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

बिहार निवडणुकीचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का नाकारण्यात आलं, याबद्दलचे प्रश्न विचारण्यात आले. ‘सुशील मोदी अजिबात नाराज नाहीत. ते पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल. त्यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाईल,’ असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, त्यांना सुशील कुमार मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मात्र याबद्दलचे प्रश्न तुम्ही भाजप नेत्यांना विचारा, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘जनमताचा कौल मिळाल्यानं राज्यात एनडीएनं सरकार स्थापन केलं आहे. सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का देण्यात आलं नाही, याबद्दलचे प्रश्न तुम्ही त्यांना (भाजपला) विचारा. कारण हा निर्णय त्यांनी घेतला आहे,’ असं कुमार म्हणाले. आमची भाजपसोबत युती आहे. आम्ही सोबत काम करतो आणि यापुढेही करत राहू, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या