Thursday, April 25, 2024
HomeराजकीयBihar Elections : प्रचार सभेत मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Bihar Elections : प्रचार सभेत मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

बिहार| Bihar

बिहार विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्यातील मतदान पार पडत आहे. तर दुसरीकडे उर्वरित टप्यातील मतदारसंघात प्रचारतोफा तापल्या आहेत. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा येथे प्रचार सभेला संबोधित केले. या सभेत मोदींनी विरोधकांवर टीकाही केली.

- Advertisement -

काय म्हंटले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतांना म्हणाले. बिहारमधील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा कोण पूर्ण करु शकेल? ज्यांनी बिहारची लूट केली ते हे करु शकतात? ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला आणि सर्वांवर अन्याय केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही. केवळ एनडीएच हे करु शकते’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

तसेच एनडीए सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात सरळ मदत केली. जवळपास एक लाख कोटी रुपयांची मदत देशातील शेतकऱ्यांना केली आहे. तसेच जवळपास 40 कोटींपेक्षा लोकांची खाती उघडली आहेत. तसेच उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून बिहारमधील 90 लाख महिलांना ग‌ॅस उपलब्ध करून दिला.

गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोय करून दिली. एनडीएने बिहारला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला आहे. तर दुसरीकडे जनतेच्या पैशांवर त्यांची (विरोधी पक्ष) नजर आहे, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. ‘पैसा हजम परियोजना खतम’, असा त्यांचा मंत्र होता. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यातही घोटाळा केला. हे लोक कधीच बिहारच्या हिताचा विचार करू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले.

करोना संकटकाळात गरिबांना धान्य मोफत दिले. बिहारमध्ये एम्स उभारण्यात येत असून गरिबांना याचा फायदा होईल. एम्सच्या उभारणीसाठी 1200 कोटी रुपये खर्च लागत आहेत. तसेच मिथिलांचरमध्ये पर्यटन विकास करण्यात येणार आहे. 2003 मध्ये नितिश कुमार रेल्वे मंत्री होते. तेव्हा त्यांनी महासेतूची मागणी केली. त्यानंतर अटल बिहारी वायपेयी यांनी महासेतूला परवानगी दिली, असे मोदी म्हणाले.

खोटे बोलून त्यांच्याबरोबरीने स्पर्धा करू शकत नाही – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चिम चंपारण्य येथे जाहीर सभेत ते बोलत होते. कॉंग्रेसचे राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पकोडे तळण्याविषयी राहुल गांधीना आठवण करून दिली. यावर राहुल गांधी यांनी आपले भाषण थांबवत तुम्ही पकोडे बनविले आहेत का? असा प्रश्न त्या व्यक्तीला केला. तसेच, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार पुढील वेळी आले की त्यांना पकोडे खायला घाला, असे राहुल गांधीं यावेळी म्हणाले.एनडीएच्या नेत्यांवर खोटे बोलण्याचा आरोप करत आमच्यात एक कमी आहे की, आम्ही खोटे बोलून त्यांच्याबरोबरीने स्पर्धा करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

बिहारमधील लोकांना दिल्ली, हरयाणा, बंगळुरूमध्ये रोजगार मिळतो, पण बिहारमध्ये मिळत नाही. याला जबाबदार नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी आहेत. आधी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन 2 कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केलं, तर लोक त्यांना हाकलून लावतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतला जाळला जातो मात्र यंदा पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानींचे पुतळे जाळण्यात आले. यांचे पुतळे जाळण्यात आले हा काही चांगली गोष्ट नाही पण शेतकरी त्रस्त आहे म्हणून हे घडलं असल्याचं गांधी म्हणाले.

दरम्यान, काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?, असा सवालही गांधींनी सभेत बोलताना केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या