Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअहमदनगरचे देशमुख बिहारमध्ये निरीक्षक

अहमदनगरचे देशमुख बिहारमध्ये निरीक्षक

अहमदनगर (प्रतिनिधी)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख खासदार रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहनप्रकाश यांनी काल दुरध्वनीद्वारे ही माहिती दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.

बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून देशमुख यांच्यासह राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खा. नामदेव उसेंडी (गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नाशिक), सुनील शिंदे (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या