Thursday, April 25, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : पंतप्रधान मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे जोरदार प्रत्युत्तर

Bihar Election 2020 : पंतप्रधान मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे जोरदार प्रत्युत्तर

दिल्ली | Delhi

बिहार निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. प्रमुख पक्षांचे नेते मैदानात उतरले आहे. पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा झाली. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. मोदींच्या या टीकेला राहुल गांधी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी म्हंटले आहे, “बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतोय. प्रश्न नतमस्तक होण्याचा नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले, हा प्रश्न आहे. लडाखमध्ये देशाची सीमा आहे. त्या सीमेवर बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील तरुण देशाचं संरक्षण करतात. उपाशी राहतात, पण परत येत नाहीत,” असं राहुल गांधी म्हणाले. तसेच “प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी आपल्याला जवानांना शहीद करून १२०० किमी जमीन चीननं घेतली. चिनी सैन्य भारतात आहे. चीन भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले होते की, भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण, खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की, चीनला परत कधी हद्दपार करणार. आणि येथे येऊन काहीही खोटं बोलू नका. बिहारींना खोटं बोलू नका. तुम्ही सांगा किती बिहारींना रोजगार दिली. मागील निवडणुकीत म्हणाले होते २ कोटी तरुणांना रोजगार देणार. कुणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात, शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व अदानीचं काम करतात.

तेजस्वी यादव यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

नितीश कुमार हे गेली १५ वर्षे झाली मंत्री आहेत. त्यांची डबल इंजिनाचं सरकार आहे. मात्र, ठाणे आणि ब्लॉकमध्ये भ्रष्टाचाराविना कुठलंही काम होत नाही. बिहारच्या लोकांकडे जो काही रोजगार होता, तो ही पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप, तेजस्वी यादव यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या