Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : कृषी कायद्यांवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Bihar Election 2020 : कृषी कायद्यांवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

दिल्ली | Delhi

बिहार विधानसभेच्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, आता शेवट्या टप्प्यातील ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्य्यासाठी प्रचार जोरात सुरू आहे. आज झालेल्या प्रचार सभेत कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधी बोलतांना म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही आणलेल्या कायद्यांमुळे शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन विकू शकतो. मला मोदींनी उत्तर द्यावं की शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्यावर शेतमाल विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा असेल तर बिहारमध्ये रस्ते आहेत कुठे?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच “मोदी खोटं बोलतात. आधी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन २ कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केलं, तर लोक त्यांना हाकलून लावतील. आम्ही रोजगार देण्याची माहिती आहे. विकास करणं आम्हाला माहिती आहे. आमच्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती मी स्वीकारतो. आम्हाला खोटं बोलणं माहिती नाही. याबाबत आमची मोदींशी स्पर्धाच नाही असंही राहुल गांधी म्हणाले. आता शेतकरी कुठेही जाऊन त्याचा शेतमाल विकू शकतो असं म्हणाणाऱ्या मोदींना राहुल गांधींनी सुनावलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या