Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : पंतप्रधानांची काँग्रेसवर जोरदार टीका, म्हणाले..

Bihar Election 2020 : पंतप्रधानांची काँग्रेसवर जोरदार टीका, म्हणाले..

बिहार। Bihar

बिहार विधानसभा निवडणकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारच्या १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांवर आज मतदान होत आहे. तसेच शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात रंग भरत आहे. अररियामध्ये प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतांना म्हणाले, “गोष्टी तर खूप केल्या, मात्र इतिहास साक्षीला आहे की एकही काम झालेले नाही. अनेक गोष्टी केल्या, लोकांची दिशाभूल केली आणि म्हणूनच लोकांना दीर्घकाळ मूर्ख बनवता येत नाही. पाहा, काँग्रेसची स्थिती काय झाली आहे? जनतेने काँग्रेसची स्थिती काय करून ठेवली आहे. आज काँग्रेसची स्थिती अशी आहे की, लोकसभा आणि राज्यसभेती दोन्हीकडील खासदारांची संख्या मोजली, तर ती १०० च्या आसपास देखील जात नाही. ही स्थिती जनतेने काँग्रेसची केली आहे. जेव्हा संधी मिळते, तेव्हा जनता आजही त्यांना शिक्षा देते.

बिहारच्या जनतेला माहित आहे की कोण विकासासाठी काम करतंय. बिहारमध्ये परिवारवाद हरतोय आणि लोकशाही, विकासाचा विजय होत आहे. आज बिहारमध्ये अहंकार हरतोय आणि मेहनत जिंकतेय, बिहारमध्ये घोटाळ्याचा पराभव होत आणि लोकांचा हक्काचा विजय होत आहे, कायद्याचं राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे. मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीची खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होतं. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,”

तसेच “बिहारमध्ये आज महिलावर्ग मोदींसोबत पुढे येण्यासाठी तयार आहे. जर बिहारमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती असती तर गरीब आईचा मुलगा आज पंतप्रधान झाला नसता. गेल्या दशकात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारनं विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. येणारं दशक हे बिहारच्या नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यचं आहे. गेल्या दशकात घराघरात वीज पोहोचली आणि आता २४ तास ते देण्याचं दशक आलं आहे,” असंही त्यांनी स्पश्ट केलं. तसंच आता पाईप गॅसद्वारे जोडणी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बिहारमध्ये आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता लोकांना विकासाचा लाभ मिळत आहे. सरकारकडून लोकांना सिलिंडर, शौचालय, आयुष्यमान भारतसारख्या योजनांद्वारे मदतीही केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जे लोकं समजात फुट पाडून सत्तेपर्यंत पोहोचू पाहत आहेत त्यांच्यापासू सावध राहण्याची आवश्यकता आहे. बिहारच्या लोकांना पक्क घर मिळत आहे. काही लोकांच्या घरांचं काम पूर्ण होऊन लवकरच ते त्यांना देण्यात येणार” असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या