Thursday, April 25, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : निर्मला सीतारामण यांनी प्रसिद्ध केला भाजपचा जाहीरनामा

Bihar Election 2020 : निर्मला सीतारामण यांनी प्रसिद्ध केला भाजपचा जाहीरनामा

दिल्ली | Delhi

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचाराला सुरवात झाली आहे. आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

- Advertisement -

बिहार निवडणुकीसाठी भाजपने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.

काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात ?

१) कोरानाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार

२) मेडीकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार

३) ३ लाख शिक्षकांची भरती करुन घेणार

४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार

५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार

६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार

७) बिहारमधील दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार

८) धान्य आणि गव्हाबरोबरच आता सरकार डाळीही विकत घेणार

९) २०२२ पर्यंत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार

१०) गोड्या पाण्यातील मात्सउत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार

११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

पंतप्रधान मोदींच्या 12 जाहीर सभा

बिहार विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. 23 ऑक्टोबरपासून प्रचाराची धूरा स्वतः नरेंद्र मोदी सांभाळणार असून त्यांच्या 12 जाहीर सभा होणार आहेत. मोदींच्या मदतीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. ते 18 जाहीर सभा घेणार आहेत. मोदी व योगींच्या सभेला व्यासपीठावर जदयूचे नितीशकुमार यांची उपस्थिती असणार आहे.

बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 28 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी जदयू आणि भाजप तर राजद व काँग्रेस अशी आघाडी आमनेसामने आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या रणधुमाळीत सामील होणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 12 जाहीर सभा घेणार आहेत. 23 ऑक्टोबरला मोदींची पहिली सभा सासाराम येथे दुसरी गया येथे तर तिसरी सभा भागलपूर येथे होणार आहे. 28 ऑक्टोबरला दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटणा येथे मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या