Thursday, April 25, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : अखेर NDA चे जागावाटप जाहीर

Bihar Election 2020 : अखेर NDA चे जागावाटप जाहीर

दिल्ली | Delhi

NDA ने बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी जागावाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री आणि बिहार एनडीएचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मंगळवारी ही घोषणा केली. आज (मंगळवार, 6 ऑक्टोबर) सकाळी भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवास्थानी गेले होते. भाजपच्या नेत्यांमध्ये बिहार भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडनवीस, बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि प्रदेश भाजप अध्यक्ष संजय जायसवाल उपस्थित होते. भाजप नेते आणि नितीश कुमार यांच्यात जागावाटपावरुन सुमारे अडीच तास चर्चा केली. त्यानंतर जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

- Advertisement -

NDA ने एकूण 243 मतदारसंघांसाठी हे जागावाटप जाहीर केले. एनडीएमध्ये संयुक्त जनता दल (JDU) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) दोन पक्ष प्रमुख आहेत. जनता दल युनायटेड (JDU) 115 जागा लढवणार आहे. तर भारतीय जनता पक्ष 112 जागा लढवणार आहे. उर्वरीत जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी संयुक्त जनता दलाला (जेडीयू) १२२ जागा मिळाल्या आहेत. जेडीयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आम मोर्चाला ७ जागा देणार आहे. यानुसार जेडीयू ११५ जागा लढवणार आहे. भाजपला १२१ जागा मिळाल्या आहेत. मुकेश सहानीच्या विकास इन्सान पार्टीला भाजपच्या कोट्यातून काही जागा देण्यात येणार आहेत.

‘लोजपा’ स्वबळावर लढणार

दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच एनडीएत फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळार लढणार आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे. रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीकडून घेण्यात आला आहे.

या बैठीकीतून बाहेर पडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माध्यमांना व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत, स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे दर्शवले. राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत भाजपा व लोक जनशक्ती पार्टीचे भक्कम युती आहे. राजकीय स्तरावर व विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जनता दल यूनायटेडशी वैचारिक मतभेद असल्याने बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लोक जनशक्ती पार्टीकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर निकालानंतर लोक जनशक्ती पार्टीचे विजयी झालेले आमदार पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मार्गाबरोबर राहून भाजपा-लोजपा सरकार बनवतील. असं देखील लोक जनशक्ती पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या