Friday, April 26, 2024
HomeराजकीयBihar Election 2020 : राष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह करणार भाजपात प्रवेश

Bihar Election 2020 : राष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह करणार भाजपात प्रवेश

दिल्ली | Delhi

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. त्यातच माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह व माजी खासदार पुतुल कुमारी यांची कन्या राष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह राजकारणात नशीब अजमावत आहे. श्रेयसी सिंह आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे.

- Advertisement -

या आधी श्रेयसी सिंहने राजदमध्ये प्रवेश करेल आणि पक्षाकडून तिकीट मिळेल अशी चर्चा होती मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून श्रेयसी आज भाजपात प्रवेश करणार आहे. श्रेयसी सिंहला भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी आणि त्यासोबतच जमुई विधानसभेतून तिकीट दिलं जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

भारताची खेळाडू म्हणून नावाजलेल्या श्रेयसीनं 2014 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत भारताचं नेत़ृत्व केलं होतं. 2018 रोजी तिने कॉमन वेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकही आपल्या नावे केलं होतं.

बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबरला निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या