तेजस्वी यादव यांचे मोदी सरकारला आव्हान, म्हणाले…

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत (BJP) फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दलासह इतर मित्रपक्षांबरोबर युती करून पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान तेजस्वी यादव यांनी सरकार नव्याने स्थापन केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. तेजस्वी यादव यांनी देशातील तपास यंत्रणांना खुले आव्हान दिले आहे. तपास यंत्रणांनी माझ्या घरी येऊन छापा टाकावा, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी केंद्रतील भाजपा सरकावरही निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यादव बोलत होते.

‘देशातील तपास यंत्रणा या भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. मात्र आम्ही त्यांना घाबरत नाही. त्यांना यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही इथे एक ऑफीस उघडू शकतो. त्यांनी कृपया यावे आणि जेवढा वेळ राहायचे आहे तेवढा वेळ राहावे. त्यांनी माझ्या घरात ऑफीस उघडायला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून त्यांना निमंत्रणच देतो. ईडी सीबीआय, ईनकम टॅक्स यांनी कृपा करुन आमच्याकडे यावे आणि जितका वेळ हवे तेवढे दिवस मुक्काम करावा.’ असे ते म्हणाले.

तसेच, २०२४ मध्ये नितीशकुमार पंतप्रधान पदाचे दावेदार असतील का? यावरही तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. ‘नितीशकुमार यांना प्रशासनाचा आणि सामाजिक कार्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते केंद्रात मंत्रीही राहीले आहेत. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकतात, तर मग नितीशकुमार का नाही? मुळात या देशात पंतप्रधान कोणीही बनू शकतो’, असे ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *