बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर खळबळजनक आरोप
राजकीय

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

सुशांत सिंह मृत्यूप्रकरनी अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहे

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

सुशांत सिंह मृत्यूप्रकरनी अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरें व महाराष्ट्र सरकारवर आरोप केले आहे. त्यांनी ट्विट करत आरोप केले आहे.

उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे,"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुशांतच्या प्रकरणात काही महत्त्वाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ते काही बॉलिवूड माफियांच्या दबावात आहे. ज्यात मित्र पक्ष काँग्रेस त्यांचे संरक्षण करत आहे." असा खळबळजनक आरोप सुशील मोदी यांनी ट्विट करून केला आहे.

तसेच त्यांनी याआधी ट्विट करत म्हंटले होते, "बिहार पोलीस सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करत आहे, त्यात मुंबई पोलीस अडथळा आणत आहे आणि बिहार पोलिसांना सहकार्य करत नाही. तसेच भाजपला वाटतय की, हे प्रकरण सीबीआयने सांभाळले पाहिजे."

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com