Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३१ मंत्र्यांचा शपथविधी

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३१ मंत्र्यांचा शपथविधी

पाटणा | Patna

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस तसेच इतर पक्षांना सोबत घेत बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकारची स्थापनी केली.

दरम्यान १० ऑगस्ट रोजी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज (१६ऑगस्ट) आज नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये ३१ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. ३१ मंत्र्यांपैकी १६ आरजेडी ११ जेडीयू एक हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.

कोणाकोणाला संधी?

जेडीयू - विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, श्रवण कुमार, संजय झा, लेसी सिंग, जामा खान, जयंत राज, सुनील कुमार, मदन साहनी, शिला मंडल

आरजेडी - आलोक मेहता, अनिता देवी, कुमार सर्वजीत, समीर कुमार महासेठ, मो. शाहनवाज, चंद्रशेखर, रामानंद यादव, सुरेंद्र यादव, कार्तिक सिंह, इस्रायल मन्सुरी, शमीम अहमद, तेज प्रताप यादव, सुधाकर सिंह आणि सुरेंद्र राम

काँग्रेस - अफाक आलम आणि मुरारी गौतम

हम - संतोषकुमार सुमन

अपक्ष - सुमीतकुमार सिंग

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com