Friday, April 26, 2024
Homeराजकीयबिहार : राजद 144, काँग्रेस 70 जागा लढवणार

बिहार : राजद 144, काँग्रेस 70 जागा लढवणार

नवी दिल्ली –

बिहार विधनासभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद)

- Advertisement -

144, काँग्रेस 70 तर डावीआघाडी 29 मतदारसंघातून लढणार आहे. तेजस्वी यादव यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6 , सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015 च्या विधानसभा निडवणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. तेव्हा जेडीयू महाघाडीचा घटक होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत जेडीयू भाजपाबरोबर एनडीए आघाडीचा प्रमुख घटक आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए निवडणूक लढवत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुकीअगोदरच यूपीएला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी(रालोसपा)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी यूपीएची साथ सोडत. बसपाला सोबत घेऊत तिसरी आघाडी निर्माण केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबरला निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या