Saturday, April 27, 2024
Homeजळगावजिल्हा दूध संघात आमदार खडसेंना मोठा धक्का

जिल्हा दूध संघात आमदार खडसेंना मोठा धक्का

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघासाठी (District Milk Union) दाखल उमेदवारी अर्जांच्या (Filing of candidature applications) छाननीप्रक्रियेवेळी (scrutiny process) मुक्ताईनगर मतदार संघातील (Muktainagar Constituency) उमेदवार भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण (Candidate BJP MLA Mangesh Chavan) यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी घेतलेली हरकत (Objection) जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई (District Election Officer Santosh Bidwai) यांनी आज फेटाळून लावली. हरकत फेटाळल्यामुळे (Rejected.) मुक्ताईनगर मतदारसंघातून आ. चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे. दरम्यान हा निर्णय (decision) आ. एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांना मोठा धक्का (Big shock) मानला जात आहे.

- Advertisement -

Breaking News : जिल्हा दुध संघाचे एमडी  मनोज लिमयेसह चौघांना अटक

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 20 जागांसाठी 179 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे व खेमचंद महाजन यांनी हरकत घेतली होती. या हरकतीवर जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी सुनावणी घेत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर सहकार अधिनियमानुसार मंदाकिनी खडसे व खेमचंद महाजन यांची हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांची उमेदवारी आता कायम राहिली आहे.

13 जणांचे अर्ज बाद

छाननी प्रक्रियेत संजय भिकारी पाटील (चाळीसगाव मतदारसंघ), उषाबाई विश्वासराव पाटील (पाचोरा), मिलिंद दयाराम वायकोळे (रावेर), दगडू धोंडू चौधरी (एरंडोल), रविंद्र दंगल पाटील (चोपडा), विनोद रामदास तराळ (मुक्ताईनगर), ठकसेन भास्कर पाटील (रावेर), गीता शिरीष चौधरी (रावेर), पुष्पाबाई समाधान पाटील (इमाव), संदीपकुमार मधुकर पाटील (भडगाव व इमाव), सुभाष एकनाथ सरोदे (रावेर), रामचंद्र संतोष मोरे (एरंडोल) या 13 जणांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहे.

रावेरात जगदीश बढेंचा एकमेव अर्ज

रावेर तालुका मतदारसंघात मविआचे उमेदवार जगदीश बढे यांनी गीता चौधरी, मिलिंद वायकोळे व सुभाष सरोदे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. या मतदार संघात एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यात बढे यांनी दाखल हरकतीनंतर गीता चौधरी, मिलिंद वायकोळे व सुभाष सरोदे यांचे अर्ज बाद ठरले. तर ठकसेन पाटील यांचाही अर्ज छाननीत बाद ठरल्याने जगदीश बढे यांचा एकमेव अर्ज या मतदारसंघात राहिला आहे.

Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी’

इंदिराताई पाटील, वाल्मिक पाटील

यांची उमेदवारी कायम

चोपडा मतदार संघात भाजप-शिंदे गटाचे संभावित उमेदवार रोहित निकम यांनी इंदिराताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदली होती. ही हरकत फेटाळण्यात आली असल्याने, या मतदारसंघात इंदिरा पाटील विरुध्द रोहित निकम ही थेट लढत होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी देखील धरणगाव तालुका मतदार संघात वाल्मिक पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत देखील फेटाळण्यात आल्याने त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे.

पारोळ्यात ‘काँटे की टक्कर’

पारोळा तालुका मतदारसंघात पारंपरिक राजकीय विरोधक असलेले आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. या तालुक्यातील लढत म्हणजे ‘काँटे की टक्कर’ मानली जात आहे.

Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

पालकमंत्र्यांविरोधात सहा तर ग्रामविकास मंत्र्याविरोधात तिघांचे अर्ज

जळगाव तालुका मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात छाया गुलाबराव देवकर, रमेश जगन्नाथ पाटील, मनोहर हरी महाजन, खेमचंद्र रामकृष्ण महाजन, गोपाळ रामकृष्ण भंगाळे आणि मालतीबाई सुपडू महाजन या सहा जणांचे अर्ज कायम आहे. या मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरूध्द माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे

. तर जामनेर तालुका मतदारसंघात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील, तुकाराम निकम, दिनेश रघुनाथ पाटील या तिघांचे अर्ज आहेत. याठिकाणी गिरीश महाजनांविरूध्द नाना राजमल पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.

उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद

अपेक्षेप्रमाणे आम्ही घेतलेली हरकत निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळली आहे. सुरूवातीपासूनच ही निवडणूक राजकीय दबावाखाली घेतली जात आहे. आम्ही आता निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरूध्द न्यायालयात दाद मागणार आहोत.

आ. एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या