राष्ट्रवादी ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी उमेश नेमाडे

jalgaon-digital
1 Min Read

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार संघटना बळकटीकरण, नवीन तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करणेसाठी राज्य ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे.

यापूर्वी उमेश नेमाडे यांनी पक्ष संघटनेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष, युवक जिल्हा सरचिटणीस, युवक जिल्हा संघटक, फादर बॉडी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष आदी जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.त्यानंतर त्यांचेकडे आता विभागीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडबद्दल त्यांचे जिल्हा निरीक्षक करण कलाटे, विधानसभा माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खा. वसंतराव मोरे, माजी आ. राजीव देशमुख, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. संतोष चौधरी, माजी आ. दिलीप सोनवणे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र भैय्या पाटील, प्रद्रेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी स्वागत केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *