Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोदी-शाहांचे पुन्हा धक्कातंत्र ! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

मोदी-शाहांचे पुन्हा धक्कातंत्र ! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

दिल्ली | Delhi

नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री व भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह (Amit Shah) यांनी पुन्हा एकदा सगळ्याचे अंदाज चुकवत आपल्या धक्कातंत्राचा वापर करत एका अगदीच नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. यापुढे गुजरातचे मुख्यमंत्री हे भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) असणार आहेत. बारावीपर्यंत शिक्षण झालेले भूपेंद्र पटेल पहिल्यांदाच २०१७ मध्ये आमदार बनले आणि मंत्री नव्हता सरळ मुख्यमंत्री झाले. राष्ट्रपतीपदासाठी नाव किंवा लोकसभा सभापतीपदासाठी शर्यतीत नसलेले नाव मोदी-शाहा जोडीने निवडले होते. नुकतेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंह तर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी बसवराज बोम्मई यांचे चर्चेत नसलेले नाव जाहीर झाले होते.

- Advertisement -

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी (Vijay Rupani) यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रूपानी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा होत्या. (Next Gujarat CM)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल (Nitin Patel) यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र, आता गुजरात भाजपने भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आल्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या आमदारांच्या (BJP MLA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tpmar) यांनी ही घोषणा केली आहे.

भूपेंद्र पटेल हे २०१७ साली गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. तब्बल एक लाख १७ हजार मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते. काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता. भूपेंद्र पटेल हे यापूर्वी अहमदाबाद महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

दरम्यान, विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील करोना स्थिती नीट हाताळ‌ता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपाणी यांना हटविण्यात आले, अशी चर्चा आहे. सूत्रांनुसार अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास गुजरातला आले होते. यानंतर लगेचच सकाळी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली, यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या