Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या“शंभर बापाची औलाद नसशील, तर…”; मोहित कंबोज यांना भास्कर जाधवांच खुलं आव्हान

“शंभर बापाची औलाद नसशील, तर…”; मोहित कंबोज यांना भास्कर जाधवांच खुलं आव्हान

मुंबई | Mumbai

काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांवर मोठे आरोप केले. यामुळे आता भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही कडाडून उत्तर देत मोहित कंबोज याना खुलं आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

“मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी समोर बघितलेली नाही. पण, संपूर्ण चॅनेलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतोय की, यातील एक तरी आरोप हा मोहित कंबोजसारखा हरामखोर माणूस… तो जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा”, असं आव्हान भास्कर जाधव यांनी दिलं.

तसेच यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली. “देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे की, आता सुरुवातच झाली असेल… तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्या सत्ता भरपूर आहे… तुमच्याकडे ईडी आहे. तुमच्या बाजूला एनआयए आहे, सीबीआय आहे. तुमच्या बाजूला सत्तेची मस्ती आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. मी ध्येयाकरिता, भूमिका घेऊन लढतो. तुमच्याकडे पोलीस खातं आहे. तुमच्या केंद्रीय यंत्रणा आहेत. अशी यंत्रणा लावा की, शंभर काय एकनाथ शिंदेंना 5 जरी फोन लावले असले, तरी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईल”, असं आव्हान जाधव यांनी फडणवीस यांनाही दिलं आहे.

दरम्यान, मी ट्रेनमधून प्रवास करताना फोन लागला नाही. तेव्हा भास्कर जाधव गायब अशा बातम्या झळकल्या. मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही. भास्कर जाधव कुणाच्या दरवाजात मला तुमच्या दरवाजा मला घ्या म्हणून याचना केली नाही. राजकारण माझे पोट भरण्याचा धंदा नाही. राजकारण माझे समाजसेवेचे साधन आहे. मी धंदे व्यवसाय शेती करून जीवन जगतोय त्यात समाधानी आहे असं भास्कर जाधव यांनी सांगितले.

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले होते?

कंबोज यांनी सोमवारी एक व्हिडीओ ट्वीट करत भास्कर जाधवांवर गंभीर आरोप केले होते. “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान १०० वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं.”

“पण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार भास्कर जाधवांना आपल्या समवेत घेण्यास राजी नव्हते. कारण प्रत्येकाला वाटत होतं, की भास्कर जाधवांवर विश्वास ठेवू शकत नाही. आज भास्कर जाधव जेवढी बडबड करत आहेत. पण त्यावेळी ते तिकीट काढून गुवाहाटीला येण्यास निघाले होते. जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या बाहेर बसणार, असं भास्कर जाधव म्हणत होते. त्यांच्याबरोबर दुसरे नेते सुनील राऊतही होते,” असा दावा कंबोज यांनी केला होता

- Advertisment -

ताज्या बातम्या