Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याBharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ यात्रा आज महाराष्ट्रात, राहुल गांधी हातात...

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ यात्रा आज महाराष्ट्रात, राहुल गांधी हातात मशाल घेऊन धावणार

नांदेड| Nanded

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून सुरू झालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला दोन महिने पूर्ण होत असून आज, सोमवारी ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

- Advertisement -

आज रात्री साधारण साडेसातच्या सुमारास त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होईल. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे.

सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील.देगलूर येथील शिवाजी चौकातून ५० हजार कार्यकर्त्यांच्या जनसमुदायासह हातात मशाल घेऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे मार्गक्रमण करतील. ते गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारा इथे जाणार आहेत.

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रेचा’ खरा प्रवास मंगळवारपासून सुरु होईल. यासाठी काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेते नांदेडच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असतील. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

‘या’ पाच जिल्ह्यातून जाणार भारत जोडो यात्रा

राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत.

काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. तामिळनाडूत द्रमुक नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काय? हे या यात्रेतून दिसून येईल. राहुल गांधी यांच्या यात्रेत आघाडीतले शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन नेते सहभागी होणार की, नाही याची चर्चा सूरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या