राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन, कोणत्या विषयांवर चर्चा?

राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन, कोणत्या विषयांवर चर्चा?

मुंबई | Mumbai

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याचे स्पष्ट संकेत ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी नुकतेच दिले होते. असे असतानाच आता राहुल गांधी यांनी राऊतांना थेट फोन केला आहे. या विषयी खुद्द संजय राऊतांनी माहिती दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. भारत जोडो यात्रेत तो दिसतोय."

राहुल गांधी यांच्या फोनवरील संवादाची माहिती दिल्यानंतर राऊतांनी जुन्या राजकारणाच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, "पूर्वीच्या राजकारणात मोठ्या मनाचे लोक होती. प्रत्येक पक्षात ज्याचे त्याचे मित्र असायचे. बंधुभाव होता-प्रेम होतं-आपुलकी होती. विरोधक असला तरी द्वेष नव्हता. कटुता नव्हता. मतभेद होते पण मनभेद नव्हते.

पण आजच्या राजकारणातून हे हरवलं आहे. मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले, कुटुंबीयांसोबत उभे राहिले? आज राज्यातल्या प्रत्येक पक्षात आमचे जुने सहकारी आहेत, पण किती लोकांनी माझी विचारपूस केली? आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी अश्यावेळी गांधी कुटुंबीयांनी ठाकरे आणि पवारांप्रमाणे माझी चौकशी केली, राजकारणात हा ओलावा वाढण्याची गरज आहे", असं राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com