Bharat Jodo Yatra : ५ महिने प्रवास, ३५७० किमी अंतर...; काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला आजपासून सुरुवात

Bharat Jodo Yatra : ५ महिने प्रवास, ३५७० किमी अंतर...; काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला आजपासून सुरुवात

जाणून घ्या, कसा असेल भारत जोडो यात्रेचा प्रवास?

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु असणाऱ्या काँग्रेसच्या (congress) 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) आजपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा होणार आहे.

हा प्रवास तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरपर्यंत असणार आहे. या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या संपूर्ण प्रवासाचं एकूण अंतर सुमारे ३५७० किलोमीटर असेल.

कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू होईल आणि तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे उत्तरेकडं जाईल आणि शेवटचा टप्पा जम्मू आणि श्रीनगरमध्ये संपणार आहे.

भारत जोडो यात्रेअंतर्गत मोकळ्या मैदानात एक गाव बांधण्यात येईल. जेव्हा यात्रा पुढच्या जागेवर जाईल, तेव्हा तेच गाव एखाद्या मोकळ्या मैदानात उभे केले जाईल. कोणीही पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा हॉटेलमध्ये कुठेही राहणार नाही. लांबचा प्रवास असल्याने खूप उष्णता किंवा आर्द्रता असेल, म्हणून फक्त एसी वापरला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com