
मुंबई | Mumbai
अजित पवारांनी (Deputy CM Ajit Pawar) राष्ट्रवादी फोडून भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) अचानकपणे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सामावून घेण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात (Shinde Group MLA) नाराजी पसरल्याची चर्चा आहे...
सत्तेत नवे वाटेकरी आल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. ज्या अजित पवारांमुळे निधीवाटपात होणारा दुजाभाव, हे प्रमुख कारण सांगण्यात आले येत होते त्यांनाचा आता सत्तेत बसवल्यामुळे शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा होत आहे. या सगळ्यावर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogavale) यांनी प्रतिक्रिया यांना आमदार नाराज आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, आता नाराज होऊन काय करणार? जी वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे. राजकारण आणि खेळात काहीही होऊ शकते. असे काही होईल, याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, या परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. आता नाराज होऊन चालणार नाही. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये थोडीफार नाराजी ही राहिलच. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धी मिळेल, जो अर्धी भाकरी खाणार होता, त्याला पाव भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे. पण राजकीय समीकरण पुढे घेऊन चालायचे असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात, अशी काहीशी मवाळ भूमिका भरत गोगावले यांनी यावेळी मांडली.