Thursday, April 25, 2024
Homeराजकीयस्वबळावर लढण्यास तयार राहा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

स्वबळावर लढण्यास तयार राहा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरवून २४ तास उलटत नाहीत तोच काँग्रेसने बुधवारी स्वबळाचा नारा दिला.

- Advertisement -

सध्या राज्यात काँग्रेसला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत. अशावेळी कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शेवटच्या स्तरापर्यंत काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार रहा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी आज नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई -विरार आणि ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समित्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी सर्वांनी एकदिलाने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी कामाला लागण्याची सूचनाही त्यांनी केली.

महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल.त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा.

काँग्रेसचे सैनिक म्हणून काम करा. पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे असून त्यांना सोबत घ्या. काँग्रेस पक्षात सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या