Saturday, April 27, 2024
Homeराजकीयशेतकर्‍यांंच्या सन्मानार्थ बहुजन मुक्ती पार्टी मैदानात

शेतकर्‍यांंच्या सन्मानार्थ बहुजन मुक्ती पार्टी मैदानात

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शेतकर्‍यांना खते, बि-बियाणे जुन्या दरापेक्षाही 50 टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत,यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली शनिवारी शेतकर्‍यांंच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विकून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व 358 तालुक्यात तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर शेतकरी समस्यांविषयी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

जळगाव शहर व तालुका बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने लॉकडाऊनचे सर्व नियम पाळुन अमजदभाई रंगरेज यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर सचिव खुशाल सोनवणे, शहर उपाध्यक्ष रियाज पटेल, सुकलाल पेंढारकर, उपाध्यक्ष रहीमभाई तांबोळी यांनी शेतकर्‍यांच्या शेतातील भाजीपाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विकला व विकला न गेलेला भाजीपाला,फळभाज्या फेकून देण्यात आल्या.

तसेच सुलतानभाई शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर अध्यक्ष इरफानभाई शेख, देवानंद निकम, सुभाष सोनवणे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना अमजदभाई रंगरेज व विजय सुरवाडे यांनी दिले.

बहुजन मुक्ती पार्टीच्या मागण्या

शेतकर्‍यांना खते, बि-बियाणे जुन्या दरापेक्षाही 50 टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तुंच्या दुकानांची योग्य व्यवस्थापन करून दिवसभर सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, बोगस बी-बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री किंवा कृत्रिम तुटवटा निर्माण करुन चढ्या दराने खते, बी-बियाणे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांंवर कार्यवाहीचे आदेश देऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश संबंधित बँकांना देण्यात यावेत, केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. या मागण्या सरकारने मान्य न केल्यास बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करेल,असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीने सरकारला दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या