Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य महिला आयोग सदस्यपदी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण; सहा जणींची झाली...

राज्य महिला आयोग सदस्यपदी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण; सहा जणींची झाली निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बागलाण राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका संजय चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा विजयकुमार पांडे, ॲड. संगीता चव्हाण, ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, उत्कर्षा रुपवते यांचा समावेश आहे….

- Advertisement -

पुढील तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आल्यामुळे बागलाण तालुक्याला मानाचे पान मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची गेल्या काही दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरीदेखील आयोगाचे सदस्यपद अद्याप रिक्त होते. या रिक्त पदांवर सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या