माझा एक फोन अन् बच्चू कडू गुवाहाटीला गेले; फडणवीसांनी गुपित फोडलं

माझा एक फोन अन् बच्चू कडू गुवाहाटीला गेले; फडणवीसांनी गुपित फोडलं

मुंबई | Mumbai

प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, 'बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांनी मी स्वत: फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, आपल्याला सरकार बनवायचे आहे, तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आहे की, तुम्ही आमच्या गटात यावं. माझ्या त्या एका फोन कॉलवरून बच्चू कडू हे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही, पण याचा अर्थ त्यांनी पैसे घेतलेत, असा होत नाही. पण बच्चू कडू हे माझ्या फोन कॉलवर गुवाहाटीला गेल्यामुळे मला त्यांच्याबाबत पूर्णपणे शाश्वती आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजी करुन शिंदे गटात केल्याचा आरोप करणे चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणामुळे आता भविष्यात रवी राणा किंवा अन्य कोणताही नेता ठरवलं तरी बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजीचा आरोप करु शकणार नाही. एकूणच रविवारी झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना बच्चू कडू यांची माफी मागायला लावली तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांची भक्कमपणे पाठराखण केली.

राज्यात सत्तांतर होऊन केवळ तीन महिने झाले आहेत आणि विरोधक महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात असल्याची आवई उठवत आहेत. काही लोकांनी शिंदे-फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला असून त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात फक्त भ्रष्टाचार आणि कांड झालीत, त्यामुळं कोणत्याही उद्योजकानं राज्यात गुंतवणूक केली नाही. त्यामुळं आता राज्याची विस्कटलेली घडी बसवण्याचं काम आम्ही करत असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com