Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आमदार बच्चू कडू यांनी थेट तारीख सांगितली, म्हणाले…

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आमदार बच्चू कडू यांनी थेट तारीख सांगितली, म्हणाले…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (११ मे) सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्या आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

बच्चू कडू म्हणाले, आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नसली पाहिजे. आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. मंत्रिमंडळात माझी वर्णी कधी लागणार, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन २१ ते २२ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.

Accident : प्रवाशांसह बस पैनगंगा नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर १७ जण जखमी

तसेच, मंत्रिमंडळ विस्तार हा आमच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी महत्त्वाचा आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती आहेत. त्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा गरजेचा आहे. आता कोणालाही मंत्री करा, पण मंत्रिमंडळ विस्तार होणे महत्त्वाचे आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

Bus Accident : भीषण अपघात! बस पुलावरून कोसळून १५ ठार, २५ जखमी… बचावकार्य सुरू

यावेळी बच्चू कडू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भातही भाष्य केले. काही बाजू सोडल्या तर न्यायाच्या बाजूने निकाल झाला आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी जे काही केले, कागदपत्रं जमा केली, ज्या पद्धतीने व्यूहरचना आखली, ते सगळं व्यवस्थित होते. त्यामुळे सत्तेच्या बाजूने निकाल लागला. विरोधी पक्षाकडून काही चुका झाल्या. पण जनतेला काम करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे लोक खुश आहेत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

लज्जास्पद! NEET 2023 परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे उतरवले कपडे अन्….

- Advertisment -

ताज्या बातम्या