“सत्ता गेली चुलीत ...तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही”; बच्चू कडूंचा थेट इशारा

“सत्ता गेली चुलीत ...तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही”; बच्चू कडूंचा थेट इशारा

अमरावती | Amravati

आमदार रवी राणा आणि आमदार व माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बच्चू कडू यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार म्हटले होते.

दरम्यान, आज बच्चू कडू यांनी अमरावती आयोजित मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्यांच्या विरोधकांना इशारा झाला. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या मागे कोण लागलं तर त्यांना सोडत नाही, असा बच्चू कडू यांनी म्हटलं.

''प्रहार आंडूपांडूचा पक्ष नाही. आम्ही रक्ताचं पाणी केलं ते राजकारणासाठी नाही केलं. दिव्यांगासाठी आम्ही काम केलं. एकानेही त्यांच्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही. ते काम आम्ही केलं. आम्ही उगाच गुवाहाटीला गेलो नाही. मंत्री होतोच की, मग शिंदे गटासोबत जाण्याची गरज काय होती. परंतु सत्ता वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तेसोबत जावं लागलं,'' असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

''आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, राणा यांची पहिली वेळ आहे म्हणून त्यांना माफ करतो. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारू नका. सत्ता गेली चुलीत. आम्हाला काही पर्वा नाही,'' असा इशारा देखील बच्चू कडून यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com