Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबाबरी पाडली तेव्हाचे उंदीर आता खंदकातून बाहेर येत आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

बाबरी पाडली तेव्हाचे उंदीर आता खंदकातून बाहेर येत आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

१९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीद पाडण्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयानं २०१९मध्ये बाबरीसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर त्यावर पडदा पडेल असं चित्र निर्माण झालं होतं.

- Advertisement -

मात्र, अजूनही राजकीय वर्तुळात बाबरी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात नव्याने दावा केला आहे. त्यावरून उद्धव ठाकरेनी चंद्रकांत पाटलांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

येत्या जून पासून लागू होणारनवीन शैक्षणिक धोरण; शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले. बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागले आहेत. उंदीरच म्हणत भाजपवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

कोणताही उंदीर बिळातून बाहेर आलेला नव्हता. त्यावेळी आत्ताचे पंतप्रधान बांग्लादेशच्या लढ्यात किंवा हिमालयात असतील पण त्यांचे नाव मला कुठं आढळून आलेले नव्हते असं म्हणत तेथ नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

दीपक केसरकरांचे शरद पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी यावेळेला भाजपाचा शब्दप्रयोग हा भरकटलेला पक्ष म्हणत तेव्हाचे सुंदरसिंह भंडारी यांनी अंगलट येऊ नये याकरिता जाहीर केले होते. हे काम भारतीय जनता पक्षाने केलेल नाही. हे जर कुणी केले असेल तर शिवसेनेने केले असेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आणि त्याच वेळेला बाबरी पडल्याची बातमी आली. मी घाबरलो आणि वर गेलो. बाळासाहेबांना सांगितलं की बाबरी पडली आणि त्यांनी सांगितलं टीव्ही लाव. त्याच वेळी फोन वाजला, संजय राऊत यांचा होता. आणि बाळासाहेब म्हणाले बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असे बाळासाहेब म्हणाले होते.

Rinku Singh : सलग ५ षटकार ठोकून सामना जिंकवणारा केकेआरचा रिंकू सिंग आहे तरी कोण?

त्यावेळी बाळासाहेब चिडले होते. आणि म्हणाले हे कसलं नपूसंक नेतृत्व. आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचे आणि घटना घडल्यानंतर पळून जायचे त्यामुळे हिंदु नेतृत्व उभे कसे राहील असे म्हंटलं होतं. आणि आत्ताचे लोक सांगायचे की माझ्या बाजूने गोळी गेली होती. शाळेच्या सहलीला जायचे आणि नंतर सांगायचे की इकडून गोळी गेली आणि तिकडून गोळी गेली. मोगलांचा इतिहास पुसता पुसता हिंदूंचा सुद्धा इतिहास पुसायला निघाले आहेत का? असा सवालही यावेळेला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

जे मिंधे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला म्हणून सत्तेसाठी पाय चाटायला भाजपा सोबत गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वतः मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. कारण बाळासाहेब ठाकरेंचा अपमानच भाजपाने केला आहे. मी त्यावेळी लखनऊ तुरुंगात शिवसैनिकांना भेटायला गेलो होतो. आता अयोध्येत राम मंदिरात दर्शनसाठी दुनिया जाते आहे. आम्ही जेव्हा अयोध्येत जात होतो तेव्हा राम मंदिराचा प्रश्न बासनात गुंडळाला होता. राम मंदिर बांधण्याचं काम होतं आहे कारण कोर्टाने हा निर्णय दिला. त्यासाठी विशेष कायदा हा मोदींनी केलेला नाही असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सावरकरांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटली?

त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या