भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बबनराव चौधरी

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बबनराव चौधरी

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तीचे पत्र त्यांना आज भाजपा कार्यालय, मुंबई येथे दिले.

बबनराव चौधरी यांनी पक्षात युवा मोर्चा शहर अध्यक्ष पदापासून कामाला सुरुवात केली. ते गेल्या चाळीस वर्षापासून भाजपात सक्रीय आहेत. त्यांनी आतापर्यंत पक्षात शिरपूर शहराध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश सदस्यपदाची जबाबदारी पार पाडली असून त्यांना उत्तर महाराष्ट्र बुथ रचना प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी पक्षाने दिली होती.

ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असून पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रविकास (म्हाडा) महामंडळ उपाध्यक्ष, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष, शिरपूर मर्चंट बँक उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. शिरपूर नगर पालिकेत नगरसेवक पदावर देखील ते कार्यरत आहेत.

नियुक्तीबद्दल त्यांचे माजीमंत्री आ. जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिना गावित, माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूर नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील आदिंनी कौतूक केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com