Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयनामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसवून सोडवेल - अजित पवार

नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसवून सोडवेल – अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) –

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडीतही

- Advertisement -

मतभेद निर्माण झाले आहे. शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरला असताना कॉंग्रेसने मात्र त्याला विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळेशिवसेनेने आपला अजंटा राबवू नये असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने मात्र, सावध भूमिका घेतली आहे. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसवून सोडवेल असे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यामध्येउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा याच मुद्द्यावरून बोलताना राज्यामध्ये नामांतराशिवायइतरही प्रश्न आहेत असे सांगत आता कोरोना, त्यावरीललस याविषयी काम करण्याची आवश्यकता आहे असं वक्तव्य केलं. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसवून सोडवेल असेही अजितदादा म्हणाले.

आणि अजितदादा चिडले ..

राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुंठेवारी संदर्भात घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आपल्या हिताचा चांगला निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आनंद झालेले १०-१२ गावांचे ग्रामस्थ अजित दादांचा सत्कार करण्यासाठी विधानभवन येतेह आले होते. बैठक संपल्यानंतर अजितदादा बाहेर आल्यावर पक्षाच्या प्रवक्त्यांनी दादांना सत्कार घेण्याची विनंती केली खरी परंतु, शीघ्रकोपी असलेले दादा संतापले आणि त्यांनी सत्कार घेण्याऐवजी सर्वांसमोर प्रवक्त्याची खरडपट्टी केली तर सत्कार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही अरे काम करू की सत्कार स्वीकारत फिरू? अशा शब्दांत सुनावले. त्या=मुळे पक्षाच्या प्रवक्त्याचा आणि कार्यकर्त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट

आज पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, “करोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली. चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असं करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते”.

- Advertisment -

ताज्या बातम्या