Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुलायम सिंह यांच्या निधनावर अतुल भातखळकरांचं वादग्रस्त ट्वीट

मुलायम सिंह यांच्या निधनावर अतुल भातखळकरांचं वादग्रस्त ट्वीट

मुंबई | Mumbai

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav) यांचं निधन (Death) झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

मुलायम सिंग यादव यांच्या निधनावर राजकारणापासून बॉलीवूडपर्यंत अनेक दिग्गजांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राजकीय विरोधक असणारे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी वादग्रस्त ट्विट केलं आहे.

कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो, असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अतुल भातखळकर यांच्या या ट्विटवर अनेक जणांनी टीका केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या