सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक; सत्तारांच्या घरावर हल्ला

सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक; सत्तारांच्या घरावर हल्ला

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी आंदोलन (Agitation) करत घरावर हल्ला चढवला...

यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तारांच्या घरावर दगडफेकदेखील करण्यात आली आहे. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्याची माहिती मिळत आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या मंत्री अब्दुल सत्तार यांची 24 तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.

सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक; सत्तारांच्या घरावर हल्ला
गोदावरीत बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com