
मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. एकापाठोपाठ एक आमदार शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात सामील होत आहे. तसेच अनेक नेते अचानक नॉट रिचेबल होत असल्याचे चित्र आहे.
आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळदेखील 'नॉट रिचेबल' असल्याचे समजते. आजच नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदावर अजय चौधरी (Ajay Chaudhary) तर प्रतोदपदावर सुनिल प्रभु (sunil prabhu) यांच्या अधिकृत नियुक्तीला मान्यता दिली आहे. या झटक्यानंतर आता नरहरी झिरवाळच नॉट रिचेबल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.