
मुंबई | Mumbai
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आमदार अपात्र प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. याप्रकरणी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत...
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला असल्याचे समजते. येत्या दोन ते तीन दिवसात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, असेही समजते.