'या' दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

'या' दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन (Special session) येत्या २ आणि ३ जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे...

आता हे अधिवेशन (session) दि. ३ आणि ४ जुलैला होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले आहे.

अधिवेशनात पहिल्याच दिवशी म्हणजे दि. ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक Assembly Speaker Election() होणार आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सभापतीपद रिक्त राहिलेले आहे. आवाजी मतदान पद्धतीने ही निवडणूक होणार असून उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com