Assembly Monsoon Session : ईडी सरकार हाय हाय, अधिवेशनपूर्वी विरोधक आक्रमक

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्याच्या विधीमंडळाचे आजपासून अधिवेशन (Monsoon session) सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे.

राज्यात शिवसेनेतून (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार (Shinde and Fadnavis Govt) सत्तेत आले आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरोधात बंड केल्यानंतरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं (Chief Minister Eknath Shinde) हे पहिलंच पावसाळी अधिवेशन आहे.

दरम्यान विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. राज्य सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सरकार येवून ४५ दिवस झाले. कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत, कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. राज्यात पूरपरिस्थिती आहे. ओला दुष्काळ (Flood) जाहीर करावा, अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करत आंदोलन केले.

राज्य सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले, गद्दार आले, ५० खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी विधीमंडळाचा (Assembly) परिसर दणाणून गेला होता. खाते वाटपावरूनही भांडणे सुरू आहेत. यावरूनही महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *