Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप उमेदवाराच्या गाडीत EVM सापडल्यानंतर EC कडून मोठी कारवाई

भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM सापडल्यानंतर EC कडून मोठी कारवाई

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली.

- Advertisement -

दरम्यान, आसाममध्ये भाजप आमदाराच्या वाहनात EVM आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आता मोठी कारवाई केली आहे.

ज्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन आढळून आले होते. त्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर निवडणूक आयोगाने वास्तविक अहवाल प्रसिद्ध केला आहे. “राताभरीतील एमव्ही शाळेत असलेल्या केंद्र क्रमांक १४९ वर १ एप्रिल रोजी रात्री ९.२० वाजता दुर्दैवी घटना घडली. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एका वाहनाची मदत घेतली. वाहनाच्या मालकाबद्दल कोणतीही चौकशी न करता ईव्हीएम आणि इतर साहित्यासह त्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसह भाजपा उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र, करीमगंजमधील या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येईल,” असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करीमगंज जिल्ह्यातील रताबारी विधानसभा मतदारसंघातील मतदानानंतर पोलिंग टीम ईव्हीएम घेऊन जात असताना कार खराब झाली. मतदान पथक स्ट्रॉंग रूमकडे जात होते. कार खराब झाल्यानंतर पथकाने निवडणूक आयोगाकडे आणखी एका कारची मागणी केली. मतदान अधिकाऱ्यांना दुसर्‍या कारची व्यवस्था करण्यास सांगितले गेले होते. परंतु तोपर्यंत त्यांनी भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या