Friday, April 26, 2024
Homeराजकीयआशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान, म्हणाले..

आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान, म्हणाले..

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. या मेट्रोकार शेडवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

- Advertisement -

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हंटले आहे की, “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार” आहोत.” तसेच अस्मितेची ढाल करून इंच इंच जमीन आमचीच हा हट्ट शिवसेनेने सोडला पाहिजे. केवळ अहंकारी वृत्तीमुळे या मेट्रो कारशेडला उशीर होत असून त्याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची राहिल असंही त्यांनी सांगितलं. कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण काँग्रेस सोबत करताय की काय? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच कांजूरमार्गच्या जागेबद्दल अनेक न्यायालयात केसेस प्रलंबित आहेत या गोष्टी आपण जनतेला का सांगितल नाही. केंद्र सरकारने 22 सप्टेंबरला या जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता, हे का लपवण्यात आले, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

दरम्यान, कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. संबंधित जमीन महसूल विभागाची असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पूर्ण केल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या