Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या२०१७ सालीच ठरलंय! भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी; शेलारांचा गौप्यस्फोट

२०१७ सालीच ठरलंय! भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी; शेलारांचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

२०१७ साली भाजप (BJP)-राष्ट्रवादी (NCP)-शिवसेना (Shivsena) या त्रिपक्षीय आघाडीचा प्रस्ताव मांडल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे….

- Advertisement -

२०१७ साली शिवसेनेला (Shivsena) सोबत घेण्यास राष्ट्रवादीचा (NCP) नकार होता. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलेत, अशी टीका त्यांनी केलेली आहे.

ते पुढे म्हणाले की, ज्या राष्ट्रवादीने एकेकाळी शिवसेनेसोबत जमुच शकत नाही असे म्हटले होते आणि आता पाहा कसे जमत आहे. आता राष्ट्रवादीने शिवसेनेशी अशी मैत्री केली आहे की, दोन भाऊ हरवले होते असेच वाटावे.

२०१७ सालीच राष्ट्रवादीला (NCP) सत्तेत सहभागी करून राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढवायच्या याबाबत सर्व चर्चा भाजपसोबत झाली होती, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे (Shivsena) नेते राजीनामे (Resignation) खिशात ठेवल्याची भाषा करत होते. तेव्हा राष्ट्रवादीसोबत खात्यांचे वाटप आणि निवडणुकांचे (Election) जागा वाटप याबाबत चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी एका कार्यक्रमात केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या