काँग्रेसकडून हिंदुत्वाचे राजकारण  - ओवैसी
राजकीय

काँग्रेसकडून हिंदुत्वाचे राजकारण - ओवैसी

प्रियांका गांधी-वढेरा यांच्या वक्तव्यावर टीका

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

काँग्रेस पक्ष नेहमीच शांत राहून हिंदुत्वाचे राजकारण करत आला आहे. त्यापेक्षा आपण हिंदुत्वाची विचारधारा मानतो हे काँग्रेसने खुलेपणाने सांगावे. काँग्रेस पूर्वीसुद्धा हिंदुत्त्वविचारधारेशी मिळालेला होता आणि आताही मिळालेलाच आहे, अशी टीका ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआएम) नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर टीका केली. कट्टर हिंदुत्त्व विचारधारेचा स्वीकार करणे ही चांगली गोष्ट आहे, असा टोला त्यांनी प्रियांका गांधी-वढेरा यांना लगावला आहे. Asaduddin Owaisi

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी केलेल्या वक्तव्यावरून ओवैसी यांनी लक्ष्य साधले आहे. Priyanka Gandhi

रामलल्लाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक समरसतेची संधी आहे. प्रभू राम सर्वांचेच आहेत. राम हे सर्वांसोबत आहेत. साधेपणा, साहस, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधु हे रामनामाचे सार आहे, असे काँग्रेस नेते प्रियांका वढेरा यांनी म्हटले आहे. वढेरा यांच्या या वक्तव्यावर ओवैसी यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली.

आता काँग्रेस पक्ष नाटक करत नसल्याचे पाहून आपल्याला बरे वाटत आहे. तुम्हाला कट्टर हिंदुत्त्वाच्या विचारधारेचा स्वीकार करायचा असेल तर ठीक आहे, मात्र बंधुभावाच्या मुद्यावर त्यांनी पोकळ चर्चा तरी करू नये, असेही ते म्हणाले.

राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमाचे समर्थन करत अशा प्रकारची प्रतिक्रिया गांधी-नेहरू कुटुंबातील नेत्याने पहिल्यांदाच दिल्याने ही प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रियांका वढेरा या उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय असून त्याचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या रणनीतीत बदल झाला असल्याचे संकेत देत असल्याचे मानले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com